मिंधे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना झटका, अटकपूर्व जामिनाला मुंबई हायकोर्टाचा नकार

मिंधे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना झटका, अटकपूर्व जामिनाला मुंबई हायकोर्टाचा नकार

बदलापूरमधील मिंधे गटाचे नेते आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. वामन म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बदलापूरमध्ये महिला पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. तेव्हा एका वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला म्हात्रे यांनी शिवीगाळ केली. अशा बातम्या देतेस जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा शब्दांत म्हात्रे यांनी या महिला पत्रकाराला सुनावले होते. त्यानंतर या महिलेने पोलिसांत म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याबद्दल मिंधे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी म्हात्रे यांनी कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर कल्याण कोर्टाने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी कल्याण कोर्टाला याबाबत वेळीच निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे. पण वामन म्हात्रे यांना तातडीची दिलासा देण्यास नकार दिला. वामन म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला. सुनावेळी सरकारी वकिलांनी म्हात्रे यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई करणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;