शिर्डीच्‍या साईमंदिरात साजरा झाला कृष्ण जन्मोत्सव

श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील 26 ऑगस्‍ट रोजी रात्री हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात ह.भ.प. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होऊन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. मंगळवारी सकाळी श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपाच्या स्‍टेजवर ह.भ.प. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे गोपालकाला किर्तन झाले. कीर्तनानंतर 12 वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांच्या वंशज परीवारातील सदस्‍य सर्जेराव अशोकराव पा. कोते यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव आनंदमय व भक्‍तीमय वातावरणात पार पडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;