बर्गर किंगला दिलासा, 6 सप्टेंबरपर्यंत पुण्याच्या रेस्टॉरंटला ब्रॅण्डचे नाव वापरण्यास न्यायालयाची बंदी

बर्गर किंगला दिलासा, 6 सप्टेंबरपर्यंत पुण्याच्या रेस्टॉरंटला ब्रॅण्डचे नाव वापरण्यास न्यायालयाची बंदी

मुंबई उच्च न्यायालयाने अमेरीकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंगला अंतरीम दिलासा दिला आहे. पुण्यातील  एका रेस्टॉरंटला ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात 6 सप्टेंबरपर्यंत ब्रँडचे नाव वापरता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने रेस्टॉरंटला ब्रँड नेम वापरण्यास बंदी घातली आहे.

मागच्या आठवड्यात बर्गर किंगने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून पुणे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. पुणे येथील बर्गर किंग रेस्टॉरंटविरुद्ध ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पुणे न्यायालयाने खटला फेटाळून लावला होता. जिल्हा न्यायालयाने खटला फेटाळल्यानंतर बर्गर किंगने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बर्गर किंगच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. चंदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने 26 ऑगस्ट 2024 रोजी सांगितले की, न्यायालयात 6 सप्टेंबरला कंपनीच्या अर्जावर सुनावणी केली जाईल. कंपनीने रेस्टॉरंटविरुद्ध अंतरिम मनाई हुकूम मागणारा अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज उच्च न्यायालयाने दाखल करत आता रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही.

फास्ट-फूड कंपनीने रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ नाव वापरण्यापासून रोखण्यासाठी खटलाही दाखल केला. कंपनीने सांगितले की, रेस्टॉरंट देखील बर्गर किंग नावाचा वापर करत आहे, ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायाला तोटा बसत असून प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;