सण-उत्सवांवेळी होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस, प्रदूषण नियंत्रणला नोटीस

सण-उत्सवांवेळी होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस, प्रदूषण नियंत्रणला नोटीस

विविध सण-उत्सवांवेळी होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना माहिती अधिकार, पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत उपाययोजना, कारवाई या संदर्भात सात दिवसांत उत्तर देण्याची मागणी केली आहे; अन्यथा हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अनेक सण, उत्सव, महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक आरोग्य आणि ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांवर गंभीर परिणाम होतात. दरवर्षी कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून दिले जाते; परंतु ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.

विविध सणांदरम्यान वापरले जाणारे उच्च डेसिबल ध्वनिप्रणालींचा सततचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या उपकरणांमुळे निवासीय शांततेचा भंग होतो आणि गंभीर आरोग्य धोके निर्माण होतात. हियरिंग इम्पायरमेंट, वाढलेला ताण आणि पूर्वीच्या आरोग्यस्थिती असलेल्या व्यक्तीवर होणारे दुष्परिणाम यांचा उल्लेख मोरे यांनी तक्रारीत केला आहे.

रात्री ध्वनिपातळी 100 डेसिबल्सपेक्षा अधिक होते, जी परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस विभाग कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याने त्वरित आणि कडक कारवाईची मागणी मोरे यांनी केली आहे. मॉनिटरिंग टीम्सची तैनाती, सूचना जारी करणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर  दंड लागू करण्याची आवश्यकता असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.

गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे, नोटिसीत संबंधित अधिकाऱ्यांना 7 दिवसांत उत्तर देण्याची मागणी केली आहे. मोरे यांच्या वतीने ऍड. त्रुनाल टोणपे, ऍड. निकिता आनंदाचे, ऍड. ओंकार रासकर यांनी नोटीस दिली आहे.

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;