आदर्श शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकही आरोपी; अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आदर्श शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकही आरोपी; अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी आटापिटा करणारे आणि या प्रकरणात हात झटकून पालकांना शाळेबाहेर काढणारे आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव चेतन आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही आरोपी करण्याचे आदेश कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी दिले. यानंतर कोतवाल, आपटे आणि आठवले हे तिघेही फरार झाले आहेत. दरम्यान, नराधम आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर पालकांसह नागरिकांचा जनप्रक्षोभ उसळला. देशभरातही संताप व्यक्त झाला. या प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.  संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्याने न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आरोपी अक्षय शिंदेलाही मोठय़ा कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायमूर्ती व्ही.ए. पत्रावळे यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

संस्थाचालकांवर बदलापूर पोलीस मेहेरबान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या माध्यमातून विद्या प्रसारक संस्थेची आदर्श शाळा चालविली जाते. अत्याचारानंतर पालकांनी शाळेकडे धाव घेतली. मात्र शाळेने हात झटकले. विद्यार्थिनींवर  अत्याचार झाला असताना त्याची खबर तातडीने शाळेने पोलीस ठाण्याला द्यायला हवी होती. मात्र शाळेने पालकांनाच दमदाटी करून पिटाळून लावले. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या शाळेचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र आज न्यायमूर्ती व्ही. ए. पत्रावळे यांनी आदर्श विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव चेतन आपटे व मुख्याध्यापक अर्चना आठवले यांनाही या प्रकरणात आरोपी बनवले.

पोलिसांनी कलम सहा वाढवले

ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी पोलिसांच्या तपासात आणि कलमांमध्ये त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले असता न्यायमूर्ती व्ही.ए. पत्रावळे यांनी या गुह्यात कलम 6 वाढवले. त्यानुसार आरोपीला कमीत कमी 20 वर्षे शिक्षा किंवा आजन्म कारावास होऊ शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;