Remo d’souza : कोरिओग्राफर रेमो डिसूझाला उच्च न्यायालयाकडून मोठा दणका

Remo d’souza : कोरिओग्राफर रेमो डिसूझाला उच्च न्यायालयाकडून मोठा दणका

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा याला उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस ठाण्यात आठ वर्षांपूर्वी नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. या याचिकेत आरोपपत्राला आव्हान देण्यात आलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या अनुपस्थितीत, दिलासा दिला जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती राजीव मिश्रा यांनी रेमो डिसोझा यांची याचिका फेटाळताना हा आदेश दिला आहे.

5 कोटी परत न केल्याने तक्रार

या खटल्यानुसार, रेमो डिसूझावर आरोप आहे की त्याने प्रतिवादी सत्येंद्र त्यागीला चित्रपटात 5 कोटी रुपये गुंतवण्याची ऑफर दिली होती. 5 कोटी रुपये गुंतवले तर 10 कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. तसेच वर्षभरात हे पैसे परत केले जातील. असे आश्वासन देखील दिलि होते. प्रतिवादीने वेगवेगळ्या मार्गाने ५ कोटी रुपये गोळा करुन रेमोला दिले होते. पण वर्षभरात पैसे न मिळाल्याने त्याने १६ डिसेंबर २०१६ रोजी गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस ठाण्यात रेमो डिसूझाविरुद्ध एफआयआर दाखल केला. एफआयआर नोंदवण्यापूर्वी रेमो डिसूझाने प्रतिवादीला अंडरवर्ल्ड डॉन प्रसाद पुजारीकडून पैसे न मागण्याची धमकी दिली होती, असाही आरोप आहे.

प्रसाद पुजारीकडून धमकवल्याचा आरोप

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी रेमो डिसूझा आणि प्रसाद पुजारी यांच्याविरुद्ध गाझियाबाद ट्रायल कोर्टात आयपीसीच्या कलम ४२०, ४०६ आणि ३८६ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्राची दखल घेत ट्रायल कोर्टाने रेमू डिसोझा यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. रेमो डिसोझा याने फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकाकर्त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला. आरोपपत्राला आव्हान दिलेले नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. याचिकाकर्त्याने केलेली मागणी चुकीची आहे. याचिका फेटाळण्यास पात्र आहे. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;