गद्दारांची प्रगती अन् महाराष्ट्राची अधोगती झाली! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

गद्दारांची प्रगती अन् महाराष्ट्राची अधोगती झाली! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईन शॉप्सची रांग लावली, कुणी बहात्तराव्या मजल्यावर फ्लॅट घेतला, कुणी डिफेंडर गाडी घेतली. पण तरुणांच्या हाताला काम देणारा रोजगार महाराष्ट्रात आला नाही. दोन वर्षांत गद्दारांची प्रगती झाली पण महाराष्ट्र अधोगतीला गेला असा घणाघात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. हाताला काम न देणार्‍या खोकेबाजांना आगामी निवडणुकीत कायमचे गाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर येथे शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दाराचा नामोल्लेख टाळून तुफान टीका केली. ज्यांनी भरभरून दिले, त्या उद्धव ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे कसे होतील? अशा स्वार्थी खोकेबाजांचा बदला तर घ्यायचाच आहे, पण बदलही घडवून आणायचा आहे. पुढील ५० वर्षांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तरुणांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, आमदार उदयसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.

मराठा आंदोलकांशी चर्चा
पैठण येथे आदित्य ठाकरे यांची रॅली सुरू असतानाच काही मराठा आंदोलक तेथे आले. आदित्य ठाकरे यांनी रॅली थांबवून या मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचे निवेदन स्वीकारले आणि म्हणणे ऐकून घेतले.

महिला असुरक्षित, कायद्याचा धाक नाही
राज्यात महिला असुरक्षित आहेत. कायद्याचा धाक राहिला नाही. हे चित्र बदलण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मशालीला साथ द्या, असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लासूर स्टेशन येथील जाहीर सभेत केले. महिलांचे रक्षण करण्यात मिंधे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला देशाची घटना बदलायची होती, परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आताही जनतेने सजग राहावे, असे ते म्हणाले.

15 लाखांचे 1500 कसे झाले?
दहा वर्षांपूर्वी बँक खात्यात १५ लाख रुपये येणार होते. आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली १५०० रुपये सरकारने जमा केले आहेत. या सरकारला पुन्हा निवडून दिल्यास ते तुम्हाला १५ रुपयांचा चेक देतील. आम्हाला केवळ ‘लाडकी बहीण’ नको तर ‘सुरक्षित बहीण’ हवी आहे, असे आदित्य ठाकरे वैजापूर येथील जाहीर सभेत म्हणाले. महिलांवर अत्याचार करणारांना भर चौकात फाशी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;