जम्मू-कश्मिरात उमेदवारीवरून भाजपमध्ये राडा; दिवसभरात तीन याद्या जाहीर, तिकीट नाकारलेल्यांचा तमाशा

जम्मू-कश्मिरात उमेदवारीवरून भाजपमध्ये राडा; दिवसभरात तीन याद्या जाहीर, तिकीट नाकारलेल्यांचा तमाशा

जम्मू-कश्मीर विधानसभेसाठी उमेदवारीवरून भाजपमध्ये भाऊबंदकी उफाळून आली आहे. इच्छुकांनी तसेच तिकीट नाकारलेल्यांनी प्रचंड तमाशा केल्यामुळे भाजपवर दिवसभरात तीन वेळा यादी बदलण्याची वेळ आली. भाजपने सकाळी ४४ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. उमेदवारांच्या राड्यामुळे सायंकाळपर्यंत यादीत केवळ १६ उमेदवार उरले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही यादी अंतिम करण्यात आली होती!

जम्मू-कश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार असून ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसर्‍या टप्प्यासाठी १० आणि तिसर्‍या टप्प्यासाठी १९ उमेदवारांची यादी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अंतिम करण्यात आली. आज सकाळी ४४ जणांची यादी जाहीर होताच कश्मीर खोर्‍यात असंतोष उफाळून आला. प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना यांच्या कार्यालयासमोर इच्छुक आणि तिकीट नाकारलेल्यांनी मोठी गर्दी केली. हा असंतोष पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना हे आपल्या कक्षात पळून गेले.

पदाधिकार्‍यांमधील तीव्र असंतोष पाहून ४४ जणांच्या यादीत काटछाट करण्यात आली आणि दुसरी यादी जाहीर करण्यात आली. दुसर्‍या यादीवरूनही प्रचंड राडा झाला. पहिल्या यादीत नाव असलेले आणि दुसर्‍या यादीत नाव कापलेले इच्छुक संतापले. हा राडा वाढताच पुन्हा दुसर्‍या यादीत काटछाट करून १६ जणांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीवरूनही नाराजांनी तमाशा केला. शेवटी प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना यांनी सध्या फक्त पहिल्या टप्प्यासाठीची यादी अंतिम करण्यावर भर देण्यात आला असून उर्वरित टप्प्यांचा नंतर विचार करण्यात येईल, असे सांगितले. परंतु पदाधिकार्‍यांचे समाधान झाले नाही. नाराजांनी घोषणाबाजी करत कार्यालय डोक्यावर घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;