‘जबरदस्तीने मिठी मारली, चुंबन घेतले’, अभिनेत्रीचा अभिनेता-दिग्दर्शकावर गंभीर आरोप

‘जबरदस्तीने मिठी मारली, चुंबन घेतले’, अभिनेत्रीचा अभिनेता-दिग्दर्शकावर गंभीर आरोप

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या कलाकारांवर आणि दिग्दर्शकांवर आरोप लावले आहेत. अनेक अभिनेत्री त्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आल्या होत्या. आता मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील अभिनेत्रींनी दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. महिलांच्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप अभिनेत्रींनी केला आहे. अभिनेत्री रेवती संपत हिने असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्टचे सरचिटणीस सिद्दीकी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यानंतर अभिनेत्री मीनू मुनीर हिनेही आरोप केले आहेत. तिने दावा केलाय की मुकेश, मणियंपिला राजू, इदवेला बाबू आणि जयसूर्या यांनी 2013 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर तिचे शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केले होते.

‘माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार झाले’

मीनू मुनीर हिने फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, २०१३ मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना या लोकांनी (मुकेश, मणियानपिला राजू, इडावेला बाबू आणि जयसूर्या) माझे शारिरीक आणि शाब्दिक अत्याचार केले. मी त्यांना सहकार्य करून काम करत राहण्याचा प्रयत्न केला, पण शोषण असह्य झाले.”

मीनू मुनीर यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले, “मी आता मला झालेल्या आघात आणि वेदनांसाठी न्यायाची मागणी करत आहे. या घृणास्पद कृत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मी तुमच्याकडे मदतीची विनंती करतेय.”

मीनूने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, या घटनेमुळे तिला मल्याळम फिल्म इंडस्ट्री सोडून चेन्नईला जावे लागले. ‘मी केरळ कौमुदीच्या एका लेखात या शोषणाविरोधात माझे मत व्यक्त केले होते’.

न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. या अहवालात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीची सत्यता आणि कामाची परिस्थिती समोर आली आहे.

अभिनेत्याने माझे जबरदस्तीने चुंबन घेतले: मीनू मुनीर

फेसबुक पोस्ट व्यतिरिक्त, मीनू मुनीरने एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही खुलासा केला आहे. “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी टॉयलेटमध्ये गेले होते आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा जयसूर्याने मला मागून मिठी मारली आणि माझ्या संमतीशिवाय माझे चुंबन घेतले. मला धक्का बसला आणि तेथून पळ काढला.” ती पुढे म्हणाली की जर, ती त्याच्यासोबत राहण्यास तयार असेल तर तिला आणखी कामाची ऑफर दिली.

अभिनेत्रीने सिद्दीकींवर कोणते आरोप केले?

रेवती संपत यांनी अलीकडेच सिद्दीकींवर आरोप करताना सांगितले की, “ही घटना तेव्हा घडली जेव्हा मी फक्त 21 वर्षांची होते. सुरुवातीला सिद्दीकीने माझ्याशी फेसबुकवर संपर्क साधला होता. त्याने मला ‘मोल’ म्हणून संबोधले. हा शब्द केरळमध्ये तरुणी किंवा मुलीसाठी वापरला जातो. पण त्याच्या मनात काय चालले आहे हे मला माहीत नव्हते, त्याने माझे शारीरिक आणि मानसिक शोषण केले.”

न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. अहवालात मल्याळम चित्रपट उद्योगाची सत्यता आणि कामकाजाची परिस्थिती समोर आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;