हे इव्हेंटजीवी सरकार! कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची, जयंत पाटील यांनी मिंधे सरकारला फटकारले
मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे इव्हेंटजीवी सरकार आहे. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची; त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे.
मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच… pic.twitter.com/mpVYqg3qAO
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 26, 2024
जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे या निर्माण कार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढंच काम निष्ठेने सुरू असल्याची त्यांनी टीका केली आहे. पुढे ते म्हणाले, राज्यभर सुरू असलेली रस्त्याची कामे देखील सुमार दर्जाची आहेत. महाराजांचा पुतळा बनवताना देखील असाच घोटाळा केला असणार. त्यामुळेच तेथील भौगोलिक परिस्थितीत पुतळा उभा राहू शकला नाही. ही सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वापरायचे. त्यांचे आचार, विचार, कृतीचा सन्मान होतोय का याबाबत सरकारला घेणेदेणे नाही असा कडक शब्दात जयंत पाटील यांनी या घटनेचा जाहीर निषेध त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरून व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List