अखेर मौनी रॉय हिने केला ‘त्या’ गोष्टीवर अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, लोकांनी…

अखेर मौनी रॉय हिने केला ‘त्या’ गोष्टीवर अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, लोकांनी…

अभिनेत्री मौनी रॉय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मौनी रॉयची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. नागिन मालिकेत धमाकेदार भूमिका करताना मौनी रॉय दिसली. यानंतर मौनी रॉय हिचे नशीब बदलले आणि तिला थेट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मौनी रॉय  हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. मौनी रॉय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मौनी रॉय सोशल मीडियावरही सक्रिय असते.

मौनी रॉय ही काही दिवसांपूर्वीच विदेशात खास वेळ पतीसोबत घालवताना दिसली. पतीच्या वाढदिवसानिमित्त ती विदेशात गेली होती. काही दिवसांपूर्वी मौनी रॉय ही आजारी पडली होती. यावेळी मौनी रॉय हिने हॉस्पिटलमधील फोटोही शेअर केले. मौनी रॉय हिच्या या फोटोनंतर चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसले.

आता मौनी रॉय हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना मौनी रॉय ही दिसलीये. मौनी रॉय म्हणाली की, मला नेहमीच म्हटले जायचे की, तू काही खूप सुंदर नाहीस. मी ज्यावेळी मुंबईमध्ये आले, त्यावेळी मला नेहमीच म्हटले जात होते की, तू अभिनेत्री बनण्यासारखी नाहीस.

मुळात म्हणजे आता मला काही गोष्टी कळतात, त्यावेळी माझ्यासाठी हे अवघड होते, कारण मी 19 वर्षाची होते. त्यावेळी मला या गोष्टींचा प्रचंड त्रास होत होता. मी खूप रडत असत. मी ज्या ठिकाणाहून आले, ज्या कुटुंबातून आले तेंव्हा माझ्यासाठी या सर्व गोष्टी खूप जास्त वेगळ्या होत्या. मला फक्त हे माहिती होते की, मला पुढे जायचे आहे.

मी एका वेगळ्याच जगातून आले होते. मला मेकअप काय हे पण माहिती नव्हते. त्यानंतर मी काही गोष्टी शिकल्या आणि पुढे गेले. लोकांना जे काही बोलायचे ते बोलतील…पण मी स्वत: वर प्रेम केले. मी खरोखरच देवाचे धन्यवाद मानते की, त्यांनी मला ते विचार करण्याची बुद्धी दिली. आता मौनी रॉय हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;