धक्कादायक! 19 वर्षाच्या मोलकरणीवर बलात्काराचे आरोप, अभिनेत्याचं करियर उद्ध्वस्त, आता असं जगतोय आयुष्य

धक्कादायक! 19 वर्षाच्या मोलकरणीवर बलात्काराचे आरोप, अभिनेत्याचं करियर उद्ध्वस्त, आता असं जगतोय आयुष्य

झगमगत्या विश्वात अनेक असे अभिनेते आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. ज्यामुळे अभिनेत्यांचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच, पण त्यांच्या बॉलिवूड करियरला देखील ब्रेक लागला. बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत देखील असंच काही झालं आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्याला तुरुंगाची देखील हवा खावी लागली. करियरची दमदार सुरुवात करणार अभिनेता आता बॉलिवूडपासून दूर स्वतःचं आयुष्य जगत आहे.

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता शायनी आहुजा आहे. शायनी आहुजा याने बॉलिवूडमध्ये दमदार सुरुवात केली. लूक्स आणि स्टाईलमुळे अभिनेता प्रसिद्धी झोतात देखील येऊ लागला होता. पण गंभीर आरोपांनंतर अभिनेत्यापासून सर्व काही दूर झालं. शायनी आहुजा याच्यावर घरातील मोलकरणीने बलात्काराचे आरोप लावले होते.

सांगायचं झालं तर, कुटुंब बॉलिवूडमधील नसताना शायनी आहुजा याने झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. अभिनेत्याचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट होते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अभिनेत्याचं बालपण शिस्तबद्ध आणि कडक वातावरणात झालं असावं.

पण मोलकरणीने केलेल्या आरोपांमुळे अभिनेत्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तुरुंगात जाण्यापूर्वी शाइनी आहुजा याने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘भूल भुलैया’, ‘लाइफ इन मेट्रो’, ‘वो लम्हे’ या सिनेमांमध्ये अभिनेता झळकला. पण 2009 मध्ये 19 वर्षीय मोलकरणीने शायनी आहुजा याच्यावर बलात्काराचे आरोप केले आणि अभिनेत्याचं संपूर्ण बॉलिवूडमधील करियर उद्ध्वस्त झालं.

अभिनेत्यावर लागलेल्या गंभीर आरोपांनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कोर्टात आरोप सिद्ध झाल्यानंतर 2011 मध्ये शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

शायनी आहुजा शेवटचा मोठ्या पडद्यावर ‘वेलकम बॅक’ सिनेमामध्ये दिसला होता. रिपोर्टनुसार, निर्दोष सुटल्यानंतर शायनी आता फिलीपिन्समध्ये असून, चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अभिनेता आता झगमगत्या विश्वापासून दूर असला तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;