Mirzapur 3 Bonus Episode: गुड्डूने मोडलं वचन? प्रेक्षक अद्यापही बोनस एपिसोडच्या प्रतीक्षेत…
‘मिर्झापूर’ सीरिजने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. आतापर्यंत सीरीजचे तीन सीझन चाहत्यांच्या भेटीस आले. तिन्ही सीझनने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता अली फझल याने तिसऱ्या सीझनच्या बोनस एपिसोडची घोषणा केली होती. 24 ऑगस्ट रोजी बोनस एपिसोड प्रदर्शित होईल… असं सांगण्यात आलं होतं. पण गुड्डू भैय्याने त्याचं वचन पूर्ण केलेलं नाही. आता ऑगस्ट महिना संपायला काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बोनस एपिसोड कधी प्रदर्शित होणार याच प्रतीक्षेत चाहते आहेत.
सांगायचं झालं तर, अली फझल याच्या सोशल मीडियावर चाहते कमेंट करत प्रश्न विचारत आहेत. ‘गुड्डू पंडित ‘मिर्झापूर 3’चा बोनस एपिसोड कधी येणार?’ दुसरा नेटकरी नाराजी व्यक्त करत म्हणाला, ‘गुड्डू भैय्या या महिन्यात बोनस एपिसोड प्रदर्शित होणार होता. तू दिलेल्या वचनाचं काय झालं?’ चाहते सतत अभिनेत्याला प्रश्न विचारत आहेत.
अली फझल याने शेअर केली गुड न्यज
अली फझलने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिलं होतं. त्यानुसार तिसऱ्या सीझनचा 11वा म्हणजे बोनस एपिसोड रिलीज होणार असल्याचं सांगण्यात आलं. 4 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये अलीने स्वत: पुढच्या भागाबद्दल सांगितलं होतं. यासोबतच एका नव्या भूमिकेबद्दल देखील अभिनेता म्हणाला होता.
y’all are not ready for this
Bonus episode aane wala hai, gaddi ki peti baandh lijiye
#MirzapurOnPrime pic.twitter.com/tZOkdFJvIt
— prime video IN (@PrimeVideoIN) August 4, 2024
सध्या अली फझल याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अली फजल ‘मिर्झापूर’ सीरिजमधील डिलिट करण्यात आलेले सीन आणि एका भूमिकेबद्दल बोलताना दिसत आहे. त्यामुळे बोनस एपिसोडमध्ये मुन्ना भौय्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली.
सध्या सोशल मीडियावर अली फझल याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे आहे. पण यावर प्राईम व्हिडीओकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्यामुळे चाहते देखील बोनस एपिसोडच्या प्रतीक्षेत आहेत.
‘मिर्झापूर’ सीरिजच्या चौथ्या भागाची तयारी सुरु
‘मिर्झापूर’ सीरिजच्या चौथ्या सीझनची तयारी सुरु झआली आहे. ज्यामध्ये सत्तासंघर्ष सखोलपणे दाखवणे अपेक्षित आहे. विशेषत: मुन्ना भैय्याच्या पुनरागमनाच्या शक्यतेने चाहते उत्सुक आहेत. सध्या सीझन 4 साठी कोणतीही निश्चित तारीख नाही, परंतु चौथा सीझन 2025 किंवा 26 मध्ये चाहत्यांच्या भेटीस येऊ शकतो… असं सांगण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List