Sindhudurg राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोळसला, पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

Sindhudurg राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोळसला, पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप त्यावेळी स्थानिकांनी केला होता. मात्र त्याकडे मिंधे सरकारने दुर्लक्ष केले होते. आज अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पूर्णत: कोसळला आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद अशा घोषणा देत भाजपनं पहिल्या सत्तेच्या काळात चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्यांच्या खोट्या शिवप्रेमाचा बुरखा फाटला असल्याच्या भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली. शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;