Pakistan: बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी गाड्यांमधून उतरवत 23 लोकांना घातल्या गोळ्या

Pakistan: बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी गाड्यांमधून उतरवत 23 लोकांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी 23 लोकांना ठार मारले आहे. पाकिस्तानमध्ये सोमवारी बंदुकधाऱ्यांनी 23 लोकांना बळजबरीने वाहनातून उतरवून गोळ्या झाडल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

AFP च्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यातील अनेक बस, ट्रक आणि व्हॅनला रोखले. दहशतवाद्यांनी लोकांच्या जातीची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत 23 जणांचा मृत्यू  तर पाच जण जखमी झाले आहेत. मुसाखेलचे वरिष्ठ अधिकारी नजीबुल्लाह काकर यांनी सांगितले की, पंजाबला बलुचिस्तानला जोडणाऱ्या महामार्गावर दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या आहेत. पंजाबहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबहून आलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना गोळी मारण्यात आली आहे.

पाकिस्तानचे वर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, सहाय्यक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले की, बंदूकधारी लोकांनी मुसाखेल येथील महामार्गावर गाड्या थांबवून प्रवाशांना उतरविले. त्यांनी 10 गाड्यांना आग लावली. या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी एक निवेदन जारी केले, त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. बलुचिस्तान सरकार दोषींना कठोर शिक्षा देईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;