महिला पत्रकार विनयभंग; वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब

महिला पत्रकार विनयभंग; वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब

बदलापूरच्या आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाचे वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकाराचा मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषेत विनयभंग केल्यानंतर त्यांच्यावर ३६ तासांनी गुन्हा दाखल झाला. मात्र वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस या संकेतस्थळावरून हा एफआयआरच पोलिसांनी गायब केल्याने बदलापुरात ‘लाडकी बहीण’ खरोखरच सुरक्षित आहे का, असा गंभीर सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

बदलापुरात 20 ऑगस्ट रोजी आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या दैनिक ‘सकाळ’च्या स्थानिक महिला पत्रकाराला मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अपमानास्पद आणि अर्वाच्च शब्द वापरले. त्यानंतर त्या महिला पत्रकाराने सातत्याने मागणी केल्यानंतरही तब्बल ३६ तासांनंतर वामन म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या महिला पत्रकाराला विविध आमिषे दाखवल्यानंतरही ती बघत नसल्याने आता वेगळ्या मागनि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे उघड झाले आहे. राज्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस या वेबसाईटवर नमूद केली जाते. प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न जाता राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हे याचे उद्दिष्ट. मात्र या संकेतस्थळावर 21 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात झालेल्या सर्व गुन्ह्यांची यादी असताना वामन म्हात्रे यांच्या विरोधातील 0386 क्रमांकाच्या एफआयआरची माहितीच गायब झाली आहे. इतर सर्व क्रमांकाचे एफआयआर नमूद असताना नेमकी वामन म्हात्रे यांच्यावरील गुन्ह्याचा एफआयआर कसा दिसेनासा झाला, असा सवाल विचारला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;