कोट्यधीश हिरोशी लग्न, सर्वांसमोर लिपलॉप; 5 वर्षांच्या मुलाची आई आहे अभिनेत्री
'एक दिवाना था', '2.0', 'क्रॅक' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ॲमी जॅक्सन नुकतीच लग्नबंधनात अडकली. 'गॉसिप गर्ल' स्टार एड वेस्टविकशी तिने इटलीमध्ये लग्न केलंय. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ॲमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.
विशेष म्हणजे या लग्नाला तिचा पाच वर्षांचा मुलगादेखील उपस्थित होता. ॲमीने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. अँड्रियास असं तिच्या मुलाचं नाव असून तो ॲमी आणि तिचा पूर्व पार्टनर जॉर्ज पनायोटो यांचा मुलगा आहे. जॉर्जसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List