स्विफ्ट मोटार अडवून चाकूच्या धाकाने चोरटय़ांनी चालकाला लुटले, अलकुड (एम) गावाजवळील घटना

स्विफ्ट मोटार अडवून चाकूच्या धाकाने चोरटय़ांनी चालकाला लुटले, अलकुड (एम) गावाजवळील घटना

कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) या गावाजवळ स्वीफ्ट मोटार अडवून चोरटय़ांनी चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटले. चोरटय़ांनी रोख रक्कम, मोबाईल असा 27 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तासगाव तालुक्यातील उपळावी येथील सागर संपत पाटील हे स्विफ्ट गाडीतून अलकुड (एम) ते करोली (एम) रस्त्याने रात्री जात असताना अज्ञात चार चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून 27 हजार रुपयांचा ऐवज लुटला. सदरची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. दोन अनोळखी इसमांनी तोंडाला मास्क लावून, रस्त्यावर दुचाकी आडवी लावून संपत पाटील यांची गाडी रोखली. त्याचवेळी टेकडीवरून आणखी दोघेजण आले. चौघांनी सागर पाटील यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ऐवज लुटून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एक महिन्यात लुटीच्या चार घटना

कवठेमहांकाळ शहरानजीक तीन दिवसांपूर्वी एका वृद्धेच्या घरात घुसून अज्ञात चोरटय़ांनी सोने लुटले होते. शेळकेवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी चोरटय़ांनी पॉलीश करण्याच्या बहाण्याने सोने लुटून नेले होते. तर, आरेवाडी व केरेवाडी येथे दरोडा पडून अवघे 27 दिवस झाले आहेत. यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकंदरीत एक महिन्याच्या कालावधीत चार ठिकाणी सोने लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;