वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने एकनिष्ठ व लढवय्या कार्यकर्ता गमावला! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा शोकसंदेश

वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने एकनिष्ठ व लढवय्या कार्यकर्ता गमावला! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा शोकसंदेश

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत.

खा. चव्हाण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून ते म्हणाले की, अत्यंत कठिण काळात ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले व लोकांच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.

गावचे सरपंच, विधानपरिषद, विधानसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य, लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून नांदेड जिल्ह्याचा विकास करणे हे हेच ध्येय ठेवून ते सतत कार्यरत होते.

राजकारणासोबतच शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.खा. वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;