पुन्हा तेच ! लग्नाचं आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, नराधमाला अखेर…

पुन्हा तेच ! लग्नाचं आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, नराधमाला अखेर…

गेल्या काही दिवसांमध्ये महिला, तरूणी, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना मोठ्या प्रमाणात वाचा फुटत असून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्यांवर झालेला अत्याचार असो की कोल्हापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची झालेली हत्या…या सर्व घटनांनी महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून, बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ मविआकडून दोन दिवसांपूर्वीच (शनिवारी) निषेध आंदोलनही करण्यात आलं. या घटनांवरून राज्यात संतापाचे वातावरण असताना आता मुंबईतून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय.

लग्नाचेवचन देऊन, त्या बहाण्याने एका महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंजाबमधील लुधियाना येथून एका 26 वर्षांच्या तरूणाला रविवारी अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतील खार पोलिसांनी सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, आणि मुंबईत आणले. राजेश अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी राजेश या दोघांची दिल्लीतील एका प्रदर्शनादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या. आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर आरोपी राजेश याने गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2024 या कालावधीत महिलेवर अनेकदा बलात्कार केला. मात्र लग्नाचा विषय काढताच तो थातूरमातूर उत्तरं द्यायचा. आपील फसवणूक करून अत्याचार करण्यात आल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि तिने पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

त्या आधआरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असता, तो लुधियानामध्ये असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला लुधियाना येथून अटक करून मुंबईत आणले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;