ऐश्वर्या रायला लागलेला सर्वात मोठा झटका, एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त, नक्की झालं तरी काय?

ऐश्वर्या रायला लागलेला सर्वात मोठा झटका, एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त, नक्की झालं तरी काय?

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. पण एक काळ असा होती, जेव्हा अभिनेत्रीला सर्वात मोठा धक्का बसला. अभिनेत्रीला बसलेला हा धक्का अभिनेता सलमान खान याच्यामुळे नव्हता .

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या आणि अभिनेता शाहरुख यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. ‘देवदास’ सिनेमातील शारुख – ऐश्वर्याच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. पण ही जोडी काही ठारावीक सिनेमांनंतर मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही. शाहरुख खान याच्यासोबत असलेल्या सिनेमांमधून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

सिनेमांमध्ये ऐश्वर्या हिच्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्रींना घेण्यात आलं आणि सिनेमे मोठ्या पडद्यावर सुपरहीट ठरले. ‘चलते चलते’, ‘कल हो ना हो’ आणि ‘वीर झारा’ यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे यादीत सामिल होते. सिनेमासाठी ऐश्वर्याला नाकारण्यात आलं, तेव्हा अभिनेत्रीला सर्वात मोठा झटका बसला. ज्यामुळे ऐश्वर्याचं करियर देखील उद्ध्वस्त झालं.

यावर खुद्द ऐश्वर्या राय हिने मोठं वक्तव्य केलं होतं. ऐश्वर्या विचारण्यात आलं, ‘तू शाहरुख खान सोबत 5 सिनेमांमध्ये काम करणार होतीस?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘हो मी देखील असं ऐकलं होतं. पण मला तशी संधी कधी मिळालीच नाही…’ पुढे ऐश्वर्याला ‘वीर-झारा सिनेमा तर तुझ्यासाठी तयार करण्यात आला होता?’

यावर ऐश्वर्या म्हणाली, ‘हो… सिनेमा माझ्यासाठीच होता. पण मल अचानक माहिती झालं, की आता मी सिनेमाचा भाग नाही आणि यावर मला कोणतं स्पष्टीकरण देखील देण्यात आलं नाही…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, ‘चलते चलते’, ‘कल हो ना हो’ आणि ‘वीर झारा’ सिनेमे तुफान गाजले…

रिपोर्टनुसार, ऐश्वर्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर किंग खान याने दुःख देखील व्यक्त केलं होतं. यावर ऐश्वर्या म्हणाली होती, ‘घडलेल्या गोष्टी मनाला ठेच पोहोचवतात…. पण त्याने कधीच सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला नाही. मी देखील कधी शाहरुखला याबद्दल विचारलं नाही.. कारण असे प्रश्न करणं माझ्या स्वभावात नाही.’ ऐश्वर्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

शाहरुख खान – ऐश्वर्या राय यांचे सिनेमे

‘देवदास’ सिनेमा शिवाय शाहरुख खान – ऐश्वर्या राय यांनी ‘मोहब्बतें’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘जोश, ‘शक्ति द पाव्हर’, ‘मोहब्बतें’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. दोघांच्या प्रत्येक सिनेमाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्या राय – शाहरुख खान याच्या सिनेमांची चर्चा रंगलेली असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;