दिवंगत दिलीप गांधी यांच्या घराची झाडाझडती, नगर अर्बन बँक घोटाळा

दिवंगत दिलीप गांधी यांच्या घराची झाडाझडती, नगर अर्बन बँक घोटाळा

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांच्या तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. 23) दुपारी माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घराची झाडाझडती घेतली. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या शोधासाठी ही झडती घेण्यात आली. मात्र, ते घरात आढळून आले नाहीत, असे उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.

आर्थिक गुन्हे शाखेमार्फत अर्बन बँक कर्ज घोटाळ्याचा तपास सुरू आहे. सुमारे 291 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आलेला असून, फॉरेन्सिक ऑडीटमध्ये संशयितांच्या नावाने झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी व त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

स्व. दिलीप गांधी यांच्या घरी काही सदस्य आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह जाऊन घराची झडती घेतली. मात्र, कुणीही आढळून आले नाहीत, असे उपअधीक्षक भारती यांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेशी संबंधित गुह्यांच्या तपासावर कोणीतरी प्रभाव टाकत आहे, असे निरीक्षण छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नोंदविले आहे. यानंतर पोलिसांनी संशयितांच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातील तपास थंडावला होता. पुन्हा तपासाला वेग आला असून, संशयितांना अटक करून न्याय मिळण्याची अपेक्षा ठेवीदारांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;