गणेश मंडळासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचना

गणेश मंडळासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचना

गणेशोत्सवात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल. त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे कार्यरत ठेवल्यास पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे कोल्हापूर पोलीस परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सांगलीच्या दौऱ्यावर असताना फुलारी यांनी काही गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेतली. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, त्यानंतरची राज्यातील राजकीय व सामाजिक स्थिती, बंद, आंदोलने यामुळे पोलिसांवर ताण आहे. अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत व मंगलमय वातावरणात पार पडावेत, यासाठी पोलीस सतर्क आहेत. गणेश मंडळांनी त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा. वेळेच्या मर्यादेचे पालन करावे. ध्वनिक्षेपकाबद्दल असलेल्या सूचना, रस्त्यावर किती टक्क्यापर्यंत मंडप उभारावा, याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, शासनाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, सर्व प्रकारचे प्रदूषण टाळावे, पर्यावरणपूरक उत्सव करावा, असे आवाहन त्यांनी केले.

फुलारी पुढे म्हणाले, ध्वनिप्रदूषण तसेच प्रकाशप्रदूषण याबाबत पोलीस दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रदूषण करणाऱ्या उत्पादनावर बंधन नाही; परंतु त्याचा वापर करून कायदेशीर तरतुदीचा भंग केल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागते. आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडला जावा, यासाठी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. यंदाच्या उत्सवात प्रत्येक मंडळाने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या मंडळाच्या देखाव्यासमोर लावावेत, अशा सक्त सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;