बाप्पाच्या आगमनात लालबागमधील गळक्या ब्रिजचे विघ्न; पालिकेच्या तकलादू कामाचा फटका

बाप्पाच्या आगमनात लालबागमधील गळक्या ब्रिजचे विघ्न; पालिकेच्या तकलादू कामाचा फटका

सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या आगमनात यंदा लालबागमधील गळक्या ब्रिजचे विघ्न पाहायला मिळतेय. पालिकेने केलेल्या तकलादू दुरुस्तीच्या कामामुळे अवघ्या काही दिवसातच या ब्रिजला पुन्हा गळती सुरू झाली आहे. लालबाग मार्पेटसमोर ब्रिजवरून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे बाप्पाची मूर्ती अक्षरशः प्लॅस्टिकने झाकून नेण्याची वेळ रविवारी सार्वजनिक मंडळांवर आली. आगमन मिरवणुकांमध्ये व्यत्यय येत असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि पालिका प्रशासन यांच्यासोबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची  बैठक झाली होती. यात समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी येणाऱ्या अडचणींपासून मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांचे अनेक मुद्दे मांडले होते. यात लालबागमधील ब्रिजचा देखील मुद्दा उपस्थित केला होता. समन्वय समितीच्या तक्रारीनंतर पालिकेने लालबागच्या ब्रिजची तात्पुरती दुरुस्ती केली खरी, पण निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे काही दिवसातच या ब्रिजला पुन्हा एकदा गळती सुरू झाली आहे. लालबाग मार्पेटसमोर पावसाचे पाणी ब्रिजच्या कोपऱयातून  मोठय़ा प्रमाणात गळत असल्याने बाप्पाची मूर्ती अक्षरशः प्लॅस्टिकने झाकून नेण्याची वेळ मंडळांवर आली.

70 हून अधिक मंडळाच्या राजांचे आगमन

विपेंडचा मुहूर्त साधत रविवारी मुंबईचा गणराज, लोअर परळचा लाडका, खेतवाडीचा लंबोदर, कोकणचा राजा, डोंगरीचा राजा, मुंबईचा पेशवा, गौरीनंदन गौरीपाड्याचा अशा जवळपास 70 हून अधिक सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे परळच्या गणसंकुल येथून धूमधडाक्यात आगमन झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आगमन सोहळे झाल्याने लालबागमध्ये गणेशभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. वाहतूक व आगमन सोहळ्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी समन्वय समितीचे प्रतिनिधी अमित कोकाटे, आशीष नरे, ऋषिकेश वाव्हळ, यशेष पटेल, शुभम जाधव, निखिल गावंड, पराग हतीम, गणेश गुप्ता, भूषण मढव यांच्यासह भोईवाडा, काळाचौकी पोलीस स्टेशन पोलीस, वाहतूक पोलीस आणि मंडळाचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला.

अजूनही शहरातील अनेक सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाचे आगमन सोहळे होणार आहेत. त्यामुळे या ब्रिजची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;