जातीनिहाय जनगणाना रोखण्याचा विचार असेल तर ते तुमचे स्वप्नच; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जातीनिहाय जनगणाना रोखण्याचा विचार असेल तर ते तुमचे स्वप्नच; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. अनेक पक्षांनी आणि जनतेनेही या मागणीला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक समुदायाच्या समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी त्या समुदायाची आकडेवारी असणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. तसेच एनडीएतील नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका सर्वेक्षणात जातीनिहाय जणगणनेबाबत जनतेची मते जाणून घेतली. त्यात बहुतांश लोकांनी जातीनिहाय जणगणनेची मागणी केल्याचे दिसून आले आहे. याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले आहेत की, मोदीजी, तुम्ही जातीनिहाय जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. आता कोणतीही शक्ती जात जणगणना थांबवू शकत नाही. देशातील जनतेचा आदेश आला आहे, लवकरच 90% जनता जातीनिहाय जनगणनेच्या मागणीला पाठिंबा देईल. त्यामुळे आताच या आदेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर पुढील पंतप्रधान याबाबतचे आदेश देताना बघा, असा इशाराच राहुल गांधी यांनी या पोस्टमधून दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;