अणुस्कुरा घाटातील वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्पच; दरड हटविण्यात अपयश

अणुस्कुरा घाटातील वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्पच; दरड हटविण्यात अपयश

राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटामध्ये पडलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीसोबत रस्त्यावर आलेले मोठमोठे दगड हटविण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही अनुसकुरा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे. शनिवारी पहाटे अणुस्कुरा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.नागमोड्या वळणांचा आणि उताराचा असलेल्या अणुस्कूरा घाटमार्गातून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगार्‍यासह मोठमोठे दगड रस्त्यात आल्याने मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही घाटमार्गातील वाहतूक ठप्पच होती. बंद झालेला घाटमार्ग मोकळा करण्यासाठी शनिवार सकाळपासून बांधकाम विभागातर्फे अथक प्रयत्न सुरू आहेत. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीच्या ढिगार्‍याखाली मोठमोठे दगड असल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये अद्याप यश आलेले नाही. काळोख आणि जोरदार पावसामुळे शनिवारी रात्री काम बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्यात आलेली माती बाजूला करण्यात आली तरी दगड हटविणे शक्य होत नाही आहे. दगड फोडण्यासाठी ब्रेकरचाही उपयोग करण्यात आला आहे. मात्र तरीही सायंकाळी उशिरापर्यंत पूर्णपणे दगड बाजूला करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;