सनी लियोनीला आहे ही वाईट सवय, दर पंधरा मिनिटांनी करते हे कृत्य…

सनी लियोनीला आहे ही वाईट सवय, दर पंधरा मिनिटांनी करते हे कृत्य…

बॉलीवूडच्या सर्वात चर्चित अभिनेत्री सनी लियोनी ही आपल्या बोल्ड आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाते. तिने बिग बॉस- 5 मधून पदार्पण केले होते. तिने अलिकडेच आपण पोर्न इंडस्ट्री सोडून इतकी वर्षे झाली तरी आपला पूर्व इतिहास कोणी विसरला नसल्याची खंत व्यक्त केली होती. परंतू सनी लियोनी हीला एक वाईट सवय आहे.तिच्या या सवयीने अनेक सहकारी अभिनेते आणि दिग्दर्शक देखील वैतागले आहेत. चला पाहूयात काय आहे तिच्या वाईट सवयी ज्यामुळे शुटींगमध्ये देखील येतो व्यत्यय …

कोणाला नखं खाण्याची सवय असते तर कोणाला पाय सतत बसल्या जागी हलवायची सवय असते. तर कोणाला चारचौघांसमोर डोकं खाजवायची सवय असते. तशी अभिनेत्री सनी लियोनी हिला एक वाईट सवय आहे.दर पंधरा मिनिटांनी ती अशी विचित्र वागत असते. आता सनी लियोनी हिची सवय थोडी म्हटलं तरी विचित्र आहेच. सनीला वारंवार आपले पाय धुण्याची सवय आहे. सनी वारंवार आपले पाय धूत असते. ती दर पंधरा मिनिटांना स्वत:चे पाय धुवून घेते. ती केवळ शुटींग वेळीच नाही. तर घरी असली तर दर पंधरा मिनिटांनी बाथरुममध्ये जाते आणि पाय स्वच्छ धुवून घेते..

सनी लियोनी भारतीय वंशाची आहे

शुटींग असो किंवा नसो कोणी आपली वाट पाहात असो किंवा असो सनीला काही पडलेले नसते. ती दर पंधरा मिनिटांनी आपले पाय धुण्यात बिझी असते. सनीला कोणता फोबिया आहे हे कळण्या पलिकडे आहे. सनी लियोनी हीने एडल्ट इंडस्ट्री सोडून साल 2012मध्ये जिस्म-2 या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी लियोनी हीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे.तिने बिग-बॉस सिझन 5 मधून पदार्पण केले होते. तिने मुलांना दत्तक देखील घेतले आहे. कॅनडाच्या सार्निया, ओंटारियो येथे भारतीय पंजाबी माता पितांच्या पोटी तिचा 13 मे 1981 रोजी जन्म झालेला आहे. तिने कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे. सनीने एडल्ट इंडस्ट्रीला राम राम ठोकला असून बॉलीवूडमध्ये प्रवेश करीत नवे जीवन सुरु केले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;