पंतप्रधान मोदी चिकलठाणा विमानतळावर येताच महाविकास आघाडीची निदर्शने; महिला अत्याचारांचा निषेध व्यक्त

पंतप्रधान मोदी चिकलठाणा विमानतळावर येताच महाविकास आघाडीची निदर्शने; महिला अत्याचारांचा निषेध व्यक्त

महिलांची सुरक्षा राखण्यास केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. रविवारी पंतप्रधान जळगाव दौर्‍यावर असताना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चिकलठाणा विमानतळासमोर मानवी साखळी करून निषेध आंदोलन करण्यात आले. हातात निषेधाचे फलक, काळे कपडे व काळ्या फिती बांधून कार्यकर्त्यांनी राज्यात व देशात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध व्यक्त केला. अर्ध्या तासाच्या मूक आंदोलनानंतर पोलिसांनी अंबादास दानवे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

विमानतळ शेजारील मातोश्री लॉन्स येथून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे शांततेच्या मार्गाने कूच केले. अनेकांच्या हातात बदलापूर, नाशिक, नालासोपारा येथील घटनेचा निषेध नोंदवणारे फलक होते. काळे कपडे परिधान करून आंदोलकांनी विमानतळाबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी अंबादास दानवे व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोडून दिले.

राज्यात व देशात घडणार्‍या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांच्या सुरक्षेची काळजी आहेच, परंतु देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत. राज्यात नाशिक, अकोला, मुंबई, पुणे व बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार व हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही परिस्थिती बघता राज्य सरकार महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम नसल्याचे अधोरेखित होत असल्याने पंतप्रधान म्हणून राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेची हमी मागण्यासाठी हे निषेध आंदोलन केल्याची भावना अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य, किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, विठ्ठल जाधव, रविंद्र तांगडे, प्रशांत जगताप, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, कमलाकर जगताप, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, एकनाथ पवार, दिग्विजय शेरखाने, भाऊसाहेब जगताप, लक्ष्मण पिवळ, रघुनाथ पाटील, सचिन तायडे, मनोज गांगवे, राजेंद्र दानवे, योगेश मसलगे, मोईन कुरेशी, रामेश्वर कोरडे, महिला आघाडीच्या दुर्गा भाटी, दिपाली मिसाळ, सुकन्या भोसले, प्रतिभा राजपूत, भागूबाई सिरसाठ, नुसरत जहां, रेखा फलके, सुनीता पाटील, पद्मा तुपे, मीना थोरवे, दिपाली बोरसे, प्राप्ती वैष्णव, सरोज मसलगे, मीना खोतकर, सीमा थोरात, रेखा शहा आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;