गणेश मुर्तींचे रंगकाम अंतिम टप्यात, कारागीरांची लगबग

गणेश मुर्तींचे रंगकाम अंतिम टप्यात,  कारागीरांची लगबग

गणेशाच्या आगमनाला पंधरा दिवस राहिले असुन कुरुळी परीसरातील मर्ती कारागीरांची रंगकाम उरकण्याची घाई दिसुन येत आहे. येथे शाडु मातीच्या गणेश मुर्तीनां मागणी सर्वात अधिक आहे. या शाडु मातीचे विघटन लवकर होते म्हणुन मुर्तींची मागणी आहे असे ओम साई आर्टसचे मुर्तीकार लाला जगताप यांनी दिली. तसेच प्लास्टर ॲाफ पॅरीसच्या गणेश मुर्ती असुन ही त्या आकर्षक आहेत. शाडु मातीच्या गणेश मुर्ती सुध्दा आकर्षक, सुंदर, आखीव आहेत. कुरुळीतील गणेश मुर्ती पिंपरी चिचंवड, मोशी, आळंदी, चिखली, केळगाव, चिंबळी, मोई, निघोजे, चाकण, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, बिरदवडी, खराबवाडी, खालुंब्रे, येलवाडी, देहू कुरुळी या परीसरात विक्रीसाठी जातात. गणेश मुर्तीवर रंगकामाचा अंतिम हात फिरवला जात आहे. पार्थिव गणेश स्थापनेला अवघे बारा दिवस राहिले आहेत. गणेश मुर्तींची मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस रंग काम चालु आहे. गणेश मुर्ती बनवण्याचे काम हे मे महिन्यापासून चालु आहे. गणेश मुर्तींना रंगकाम केमिकल विरहित आहे. नैसर्गिक रंगांचा वारर केलेला आहे. गणेश मुर्तींना हिरेजडित असा फेटा मुकुटावर बांधण्यात आलेला आहे. यामुळे मुर्तीला देखणे रुप प्राप्त झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;