कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी, आमदरांना 100 कोटींची ऑफर; काँग्रेसचा खळबळजनक दावा

कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी, आमदरांना 100 कोटींची ऑफर; काँग्रेसचा खळबळजनक दावा

देशातील ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, तेथील सरकार फोडा, विकत घ्या आणि राज्य करा, या धोरणानुसार भाजप आमदारांचा बाजार मांडत असल्याचे दिसून आले आहे. याआधीही भाजपने या खेळ काही राज्यात केला आहे. आता काँग्रेसचे कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. याआधीही भाजपने असा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. आता पुन्हा भाजपकडून ऑपरेशन कमळ करनाटक सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसने केला आहे.

कर्नाटकचे काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी रविवारी याबाबत भाजपवर खळबळजनक आरोप केले. कर्नाटकात भाजपने पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीला सुरुवत केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. याआधीही भाजपने असा प्रयत्न केला होता. मात्र, राज्यातील काँग्रेसचे सरकार मजबूत आहे. आता भाजपने आमदारांची किंमत दुपटीने वाढवून आमदार विकत घेण्यासाठी भाजप 100 कोटी द्यायला तयार असल्याचा आरोपही गौडा यांनी केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार अस्थिर करून सत्तास्थापनेसाठी भाजप 100 कोटी रुपयांची ऑफर देत काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमच्या पक्षातील एकही आमदार भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, असा विश्वास व्यक्त करत कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याआधीचा प्रयत्न फसल्याने आता भाजपने 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. त्यांना 50 आमदार खरेदी करायचे आहेत. याबाबत मलाही कुणीतरी फोन केला होता, मी त्याला म्हणालो 100 कोटी रुपये तुमच्याकडेच ठेवा. आमचे सरकार मजबूत आहे. भाजपकडून सातत्याने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा विश्वासही गौडा यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;