कोण आहे प्रियांका चोप्राची होणारी वहिनी? सौंदर्याच्या बाबतीत ‘देसी गर्ल’लाही देते टक्कर
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. कारण प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकणार आहे. भावाच्या लग्नासाठी प्रियांका भारतात आली आहे. अशातच तिची होणारी वहिनी कोण आहे, याविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
प्रियांकाच्या होणाऱ्या वहिनीचं नाव नीलम उपाध्याय असं आहे. नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून 2012 मध्ये तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. 'मिस्टर 7' या तेलुगू चित्रपटातून तिने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
नीलमने तेलुगूसोबतच तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करतेय. सोशल मीडियावर नीलमचा मोठा चाहतावर्ग आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List