सुनीता विल्यम्स ‘या’ दिवशी परतणार पृथ्वीवर, नासाने केले जाहीर

सुनीता विल्यम्स ‘या’ दिवशी परतणार पृथ्वीवर, नासाने केले जाहीर

गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची अमेरीकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिच्या पृथ्वीवर येण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नासाने सुनिता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर दोघंही 2025 मध्ये पृथ्वीवर येणार असल्याचे जाहीर केले आहे. तोपर्यंत हे दोन्ही अंतराळवीर अंतराळयानाच्या स्पेस स्टेशनमध्येच राहतील. नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशनने स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत करणे खूप धोकादायक आहे, ज्यामुळे बोईंगची स्टारलाइनर कॅप्सूल या दोन अंतराळवीरांशिवाय परत येईल.

मोहिमेचा एक भाग म्हणून विल्मोर आणि विल्यम्स औपचारिकपणे त्यांचे काम सुरू ठेवतील आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी ते पृथ्वीवर परत येतील. याचा अर्थ असा की जे चाचणी उड्डाण एका आठवड्यात होणार होते ते आता सुमारे 8 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. नासाने सांगितले की, सुनीता आणि विल्मोर एजेंसीच्या स्पेसएक्स क्रू-9 मिशनसाठी निवड केलेल्या दोन अन्य चालक दलाच्या सदस्यांसोबत ड्रॅगन अंतराळ यानातून परतणार आहेत. स्टारलायनरच्या अंतरिक्ष स्टेशनवरुन निघायला आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पृथ्वीवर प्रवेश आणि लॅण्डिंग करणार असल्याची आशा बाळगतो.

सुनीत विल्यम्स आणि बुच विल्मोर ज्यांनी जूनमध्ये नासाच्या बोईंग क्रू फ्लाइट टेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केले होते, ही अंतराळ यात्रा 10 दिवसांचीच होती, मात्र यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही अंतराळ यात्री गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळातच अडकले आहेत. दोघांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सुलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;