नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाकडून दु:ख व्यक्त; म्हणाली ‘गेल्या काही वर्षांत..’

नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाकडून दु:ख व्यक्त; म्हणाली ‘गेल्या काही वर्षांत..’

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकत्याच एका फॅशन शोमध्ये डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्प वॉक केला होता. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फॅशन शोमधील तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूर्व पती नाग चैतन्यच्या दुसऱ्या साखरपुड्यानंतर समंथा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात झळकली होती. नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता. चार वर्षांच्या संसारानंतर समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले होते. त्यानंतर आता त्याने आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात केली आहे. यावर समंथाने मोकळेपणे कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टची चर्चा होऊ लागली आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रिलेशनशिप, मैत्री आणि प्रेमाचा त्याग या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

समंथाची पोस्ट-

‘मैत्री आणि नातेसंबंध हे परस्परपूरक असतात असं अनेकांना वाटतं आणि त्याच्याशी मी सहमत आहे. तुमच्याकडून प्रयत्न होतात, माझ्याकडूनही ते प्रयत्न होतात. पण गेल्या काही वर्षांत मी एक गोष्ट शिकले की समोरची व्यक्ती तुम्हाला काही देण्याच्या स्थितीत नसली तरी प्रेमापोटी तुम्ही त्या व्यक्तीसाठी सतत प्रयत्न करत असता. तेव्हा ते नातं तुमच्या आणि माझ्या प्रयत्नांच्याही पलीकडे जातं. जोपर्यंत समोरची व्यक्ती पुन्हा तुमच्यासाठी प्रयत्न करण्याच्या स्थितीत येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रयत्न करत राहता. इथपर्यंत ते नातं पोहोचतं. त्यांच्याबाबतीतही हीच गोष्ट असते. प्रेम हा त्याग आहे. जरी ठराविक वेळेसाठी हा देण्याघेण्याच्या समतोल ढासळला तरी. माझ्याकडे मोबदला देण्यासाठी काही शिल्लक नसतानाही ज्या लोकांनी माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेमाचा वर्षाव केला, त्यांच्यासाठी मी कृतज्ञ आहे’, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं. 8 ऑगस्ट 2024 रोजी नाग चैतन्य आणि सोभिताने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सोभित आणि नाग चैतन्य हे दोघं लवकरच जल्लोषात लग्न करतील. या दोघांचं लग्न हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतर ते रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;