प्लास्टिक सर्जरीवरून ट्रोल करणाऱ्यांना अखेर आयेशा टाकियाने दिलं उत्तर

प्लास्टिक सर्जरीवरून ट्रोल करणाऱ्यांना अखेर आयेशा टाकियाने दिलं उत्तर

अभिनेत्री आयेशा टाकिया सध्या तिच्या बदललेल्या लूकमुळे तुफान चर्चेत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमधील तिचा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. प्लास्टिक सर्जरी करून आयेशाने तिचा चेहरा खराब केला, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ही ट्रोलिंग इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की त्याला वैतागून आयेशाने थेट तिचा इन्स्टाग्राम अकाऊंटच डिअॅक्टिव्हेट केला होता. आयेशाने तिचा अकाऊंट डिलिट केला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. मात्र त्याच्या काही तासांनंतर तिने पुन्हा अकाऊंट सुरू केलं आणि ट्रोलर्ससाठी विशेष पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे आयेशाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

आयेशाने इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करताच स्वत:चा एक बुमरँग व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ती काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचाच पँट परिधान केला आहे. आरशात सेल्फी काढतानाचा हा बुमरँग व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘अतिशय संयमी, अतिशय मनमिळाऊ.’ त्यानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. ‘मी कसं प्रत्युत्तर दिलं नाही हे तुमच्या लक्षात आलं का? अतिशय मनमिळाऊ, अतिशय गोड आणि अतिशय संमी’, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)

याआधी आयेशाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने सोनेरी काठाची आणि निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने भरजरी दागिने घातले आहेत. मात्र आयेशाचा चेहरा यामध्ये पूर्णपणे वेगळा दिसून येत होता. तिने प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स केल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं होतं. ‘तू तुझा चेहरा आणि नैसर्गिक सौंदर्याची वाट लावलीस’, असं एकाने म्हटलं होतं. तर ‘चेहरा खराब करायची काय गरज होती’, असं दुसऱ्याने विचारलं होतं. ‘तू आधी किती सुंदर दिसायची, आता अशी का दिसतेस’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला होता.

आयेशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. आयेशाच्या कमबॅकची प्रतीक्षा चाहत्यांनी खूप केली, मात्र तिच्याकडून कोणत्याच प्रोजेक्टची घोषणा झाली नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा तिला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं, तेव्हा पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर आयेशाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;