Amravati accident news – गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही पलटी; एकाचा मृत्यू, 28 जखमी

Amravati accident news – गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही पलटी; एकाचा मृत्यू, 28 जखमी

अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाहीचा भीषण अपघात झाला आहे. गाईला वाचवण्याच्या प्रयत्न शिवशाही पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूरहून ही शिवशाही बस अकोल्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर बसच्या समोर एक गाय आली. तिला वाचवण्याचा प्रयत्न शिवशाही बस चालकाने केला. यादरम्यान त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

सदर अपघातामुळे अमरावती-नागपूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर क्रेनच्या मदतीने शिवशाही सरळ करून महामार्गा सुरू करण्यात आला.

नक्की काय घडलं?

दरम्यान, या अपघातात शिवशाहीच्या चालकालाही दुखापत झाली आहे. हा अपघात नक्की कसा झाला याबाबत माहिती देताने त्याने सांगितले की, नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन निघालो होतो. त्याचवेळी महामार्गावर अचानक बससमोर एक गाय आली. गाईला वाचवण्यासाठी करकचून ब्रेक दाखले आणि बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक घडलेल्या घडामोडीत बस पलटी झाली. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 35 प्रवासी होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;