‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक ट्विस्ट; एजेच्या हॉटेलमध्ये लीला करणार वेटरची नोकरी
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. लीला आणि एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत.
कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला संधीचं सोनं कसं करते हे पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. मालिकेत सध्या लीलाच्या घरच्यांना साळुंखेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली आहे.
रक्षाबंधनला साळुंखे घरात असताना एजे लीलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोनबद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला ऐनवेळी येते आणि नकार देते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List