मुंबईस्थित कुडाळ, मालवणवासीयांची बुधवारी शिवसेना भवन येथे बैठक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी, शिवसेना पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक बुधवार, 28 ऑगस्ट रोजी शिवसेना भवन, दादर येथे होणार आहे.
बुधवारी सायंकाळी 7 वाजता शिवसेना भवन येथे होणाऱ्या या बैठकीला कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई व मुंबईच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ-मालवणवासीयांनी मोठय़ा संख्येने बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – पंढरीनाथ तावडे – 9322909277.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List