पालिकेने पाच वर्षांत 2360 कोटींची मुदत ठेव मोडली, सहा वेळा बेस्टला मदत देण्यासाठी पैसे काढले

पालिकेने पाच वर्षांत 2360 कोटींची मुदत ठेव मोडली, सहा वेळा बेस्टला मदत देण्यासाठी पैसे काढले

पालिकेने पाच वर्षांत 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडली आहे. यामध्ये ‘बेस्ट’ला मदत करण्यासाठी सहा वेळा मुदत ठेवीतून पैसे काढले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागितली होती. पालिकेच्या उप प्रमुख लेखापालने  दिलेल्या माहितीनुसार 2360 कोटी 20 लाख 19 हजार रुपये अशी मोडलेल्या मुदत ठेवींची रक्कम आहे. ‘बेस्ट’ला मुदत ठेवीमधून मदत करताना 2019-20 च्या 19 ऑगस्ट 2019 रोजी 250 कोटी आणि 113 कोटी अशा 2 मुदत ठेवी मोडल्या. 21 ऑगस्ट 2019 रोजी 115 कोटींची मुदत ठेव पुन्हा बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडली. 2022-23 च्या 25 मार्च 2022 रोजी बेस्ट अधिदान करण्याकरिता एकाच दिवशी 3 मुदत ठेवी अनुक्रमे 100 कोटी, 92.06 कोटी आणि 87.06 कोटी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या.

कर्मचाऱ्यांसाठी मोडली; 645.20 कोटी काढले

n कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनधारकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन/ निवृत्तीवेतनाचे अधिदान गणेशोत्सव सणापूर्वी दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियातून 29 ऑगस्ट 2022 रोजी 645,20,07,000 इतकी मुदत ठेव मोडली.

n तर एमएमआरडीएला अधिदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात जमा असलेली 949,50,00,000 इतकी मुदत ठेव दिनांक 15 मार्च 2024 रोजी मोडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;