मराठवाड्यासाठी गुड न्यूज! नाशिक, नगरमधील पावसामुळे 16 हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे…

मराठवाड्यासाठी गुड न्यूज! नाशिक, नगरमधील पावसामुळे 16 हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे…

कोपरगाव शहरासह तालुक्याला शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे दारणा 97 तर गंगापूर धरण 93 टक्के भरले आहे. कोपरगामध्ये 80 तर ब्राम्हणगांवला 73 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीतून 16 हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे वाहू लागले.

हवामान खात्याने नगर जिल्हयात मुसळधार पाउस कोसळेल असा अंदाज शुक्रवारी वर्तवला होता. त्याप्रमाणे कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले. ईगतपुरी आणि त्रंबकेश्वर येथील पाउस प्रचंड होता त्यामुळे दारणा व गंगापूर धरण 100% भरले टक्के भरले आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. धोत्रे परिसरात काल झालेल्या अति पावसामुळे काही शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. चारा कडवळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या प्राथमिक माहितीनुसार, काल झालेल्या पावसामुळे कोकमठाण मंडळातील वारी, सडे गावात मागुबाई भालचंद्र पडघडमल यांची कट नंबर 109 मधील विहीर पडली गेली. कोपरगाव रवंदे, पोहेगाव, सुरेगाव मंडळात चांगला पाऊस झाला, मात्र नुकसान झाले नाही. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातुन 16 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले होते.

तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असून नाशिक व नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 84 दिवसातील शुक्रवारचा पाऊस दणकेबाज होता. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याने शासनाचा कोटीच्या कोटी रूपयांचा महसुल अक्षरक्षः पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. 1 जुन पासुन ८४ दिवसांत नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातुन गोदावरी नदीतून 2 लाख 17 हजार 833 क्युसेक्स पाणी जायकवाडीकडे वाहून गेले आहे.

कोपरगाव शहरात दुपारी 4 वाजेपासुन ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत अधुन मधुन पावसाच्या संततधार सरी कोसळत होत्या.  पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्यांने अनेक सखल भागासह उपनगरात देखील पाणी साठले. चालु पावसाळी हंगामातील 84 दिवसातील कोसळधार पडणारा हा पहिलाच पाउस कोपरगांवकरांनी अनुभवला. 21 ऑगस्ट रोजी मायगांवदेवी, सांगवीभुसार या भागात चांगला पाउस झाला होता. पावसामुळे काही भागातील ओढे, नाले प्रथमच वाहु लागले आहेत. गारदा नाला तीन वर्षांनी पहिल्यांदाच वाहू लागला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;