युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवार, सोमवार छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर; शिवसंकल्प मेळाव्यातून साधणार संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवार, सोमवार छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर; शिवसंकल्प मेळाव्यातून साधणार संवाद

25 ऑगस्ट – सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर पश्चिम
26 ऑगस्ट – पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे दोन दिवस छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर येत आहेत. शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून ते शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता सिल्लोड येथे प्रियदर्शिनी चौकात आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात शिवसंकल्प मेळावा होणार आहे.

सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पैठण येथे माहेश्वरी धर्मशाळेत त्यानंतर दुपारी 12.15 वाजता लासूर स्टेशन येथे लक्ष्मीनारायण लॉन्स येथे शिवसंकल्प मेळावा होणार आहे. दुपारी 2 वाजता वैजापूर येथे त्यानंतर सायंकाळी 6 वाजता कन्नड येथे शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;