कोकणातले रस्ते खराब, मला ट्रेननं यावं लागलं; रामदास आठवले यांचा भाजपला घरचा आहेर

कोकणातले रस्ते खराब, मला ट्रेननं यावं लागलं; रामदास आठवले यांचा भाजपला घरचा आहेर

मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरवस्थेवरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत, असे सांगत आठवले यांनी या महामार्गाच्या दूरवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले. मात्र, कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत. मी रस्त्याने येणार होतो पण रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेनने यावं लागल्याचे आठवले यांनी सांगितलं. खेडमधील नागरी सत्कार कार्यक्रम दरम्यान रामदास आठवले बोलत होते. मुंबई-गोवा, मुंबई अहमदाबाद आणि मुंबई-पुणे महामार्गाच्या दूरवस्थेबाबत विकोधक आणि जनता रोष व्यक्त करत आहे. मात्र, आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेननं यावं लागलं. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे. पर्यटन विकासासाठी हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा विकास होताना कोकणाकडे दुर्लक्ष व्हायला नको, असेही आठवले म्हणाले.

अन्याय सहन करत असताना आंबेडकरांसारखा माणूस देशासाठी लढत होता. देशातील विषमता नष्ट करण्यासाठी ते रात्र रात्र जागले. वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान…असेही आपल्या शैलीत आठवले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;