अभिनेत्रीने केले चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप, म्हणाली, त्याने मला बेडरूममध्ये बोलावत स्पर्श करत..

अभिनेत्रीने केले चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप, म्हणाली, त्याने मला बेडरूममध्ये बोलावत स्पर्श करत..

एका अभिनेत्यावर सतत गंभीर आरोप केले गेले. हेच नाही तर या आरोपांनंतर लोक हैराण झाल्याचेही बघायला मिळतंय. यामुळेच मल्याळम फिल्म इंडस्ट्री चर्चेत आलीये. अभिनेता दिलीपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले जात आहेत. आता एका बंगाली अभिनेत्रीने मल्याळम दिग्दर्शकावर गंभीर आरोप केला. हे प्रकरण सतत वाढताना दिसत आहे. त्यावेळी नेमके काय घडले हे सांगताना देखील अभिनेत्री दिसली. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने हे आरोप मल्याळम दिग्दर्शक रंजीत याच्यावर केले. 

अभिनेत्रीने थेट दावा केला की, रंजीतने तिला बेडरूममध्ये बोलावले आणि तिच्या शरीराला चुकीचे स्पर्श केले. श्रीलेखाने हे देखील सांगितले की, ही घटना 2009 मध्ये घडली होती, ज्यावेळी ती ऑडिशनसाठी पोहोचली होती. आता तब्बल 15 वर्षांनंतर याबद्दल भाष्य करताना श्रीलेखा ही दिसली आहे. नुकताच तिने याबद्दलचा खुलासा हा एका मुलाखतीमध्ये केला आहे. 

श्रीलेखाने म्हटले की, रंजीतने मला त्यावेळी बेडरूममध्ये बोलावले. त्यावेळी बेडरूममध्ये खूप जास्त अंधार होता आणि त्या रूमला एक बाल्कनी देखील होती. त्यावेळी बोलत असताना त्याने माझ्या बांगड्यांना हात लावला. त्यावेळी मी खूप जास्त अस्वस्थ झाले. बोलणे सुरू ठेवण्याचाच प्रयत्न मी केला. मी काहीच रिप्लाय देत नसल्याचे पाहून त्याने माझ्या मानेला हात लावला. 

माझ्या शरीराला तो स्पर्श करत होता. जे मला अजिबातच सहन होत नव्हते. मी त्यानंतर थेट खोलीमधून पळून गेले. ते माझ्यासाठी खूप जास्त हैराण करणारे आणि धक्कादायक नक्कीच होते. त्यावेळी असे होते की, ही घटना मी कोणासोबतही शेअर करू शकत नव्हते. या घटनेनंतर मी इतकी जास्त घाबरले की, मी हॉटेलमध्येच राहिले. मी फक्त आणि फक्त सकाळ होण्याची वाट पाहात होते.

मला माहिती होते की, या क्षेत्रामध्ये चांगेल आणि वाईट दोन्ही काम होतात. श्रीलेखाने केलेल्या या आरोपांवर रंजीतने देखील उत्तर देत म्हटले की, हे सर्व आरोप चुकीचे आहेत. रंजीत यांनी म्हटले की, ही कथित घटना कधी घडलीच नाहीये. श्रीलेखा मित्राचे ऑडिशन चांगले गेले नाही आणि तिला त्याबद्दलची माहिती देण्यात आली होती. हे आरोप कोणत्यातरी कारणामुळे केले जात आहेत. यावर जी कारवाई करणे शक्य आहे ती कारवाई केली जाईल. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;