जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट, 22 जखमी तर 4 जणांची प्रकृती गंभीर

जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट, 22 जखमी तर 4 जणांची प्रकृती गंभीर

जालना येथील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या लोखंडी सळ्याचे उत्पादन करणार्‍या गजकेसरी स्टील कारखान्यामध्ये शनिवारी भीषण स्फोट झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात 22 जण जखमी झाले असून चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जालना येथील ओम मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले.

कारखान्यात झालेल्या या स्फोटामुळे प्रचंड आवाज झाला आणि आजूबाजूला धुळीमुळे अंधारही पसरला होता. या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाकडून अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटात कोणाचाही मृत्यू झाला नाही. चंदनझिरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;