मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप?, ‘ही’ अभिनेत्री म्हणाली, मी अर्जुनच्या प्रेमात आणि…

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप?, ‘ही’ अभिनेत्री म्हणाली, मी अर्जुनच्या प्रेमात आणि…

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे नव्हे तर खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. अर्जुन कपूर याच्यासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका ही सतत विदेशात फिरताना दिसतंय. अरबाज खान याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर मलायका ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. दोघेही एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याने शेअर केलेली एक पोस्ट पाहून सर्वजण चिंतेत आले होते.

मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा असताना अभिनेत्री उर्फी जावेद हिने अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. हेच नाही तर आपल्याला अर्जुन कपूर खूप जास्त आवडत असून आपण त्याच्या प्रेमात असल्याचेही उर्फी जावेद हिने म्हटले. थोडक्यात काय तर अर्जुन कपूर याच्यावरील आपले प्रेमच उर्फीने व्यक्त केले.

उर्फी जावेद ही म्हणाली की, मी आतापर्यंत अर्जुन कपूरला दोन पार्ट्यांमध्ये भेटले आहे. मी ज्यावेळी त्याच्या पुढे जाते, त्यावेळी मला काय बोलावे हेच कळत नाही आणि मी घाबरते.मी माझ्या मनामध्ये त्याच्यासोबत काय काय केले ते काय सांगू ना…मी फक्त अर्जुन कपूरला म्हणाले की, माझे नाव तर माहितीच असेल.

अर्जुन कपूर याच्या प्रेमात उर्फी जावेद पडली आहे. यासोबतच उर्फी जावेद हिने अजून एक मोठा खुलासा केलाय. उर्फी जावेद म्हणाली, माझा प्रेमावर अजिबातच विश्वास नाहीये. एक मोठा स्टार मला आवडत होता आणि मी त्याच्यासोबत दोन दिवस फोनवर देखील बोलत होते. मात्र, त्याने मला स्पष्ट सांगितले की, मला रिलेशनशिपमध्ये राहायचे नाहीये.

मला फक्त तुझ्यासोबत रिलेशन तयार करायचे आहे. हे एकून मी त्या स्टारला बोलणे बंद केल्याचेही उर्फी जावेद हिने म्हटले. उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली. काही मालिकांमध्ये तिने धमाकेदार भूमिका देखील केल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;