कोलकातामध्ये पुन्हा धक्कादायक घटना, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला आणि…

कोलकातामध्ये पुन्हा धक्कादायक घटना, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला आणि…

कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण ताजं असताना कोलकाता येथे आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या अभिनेत्रीच्या कारवर हल्ला झाला ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जी आहे.

कोलकाता येथील साऊथर्न एव्हेन्यू येथील काही दुचाकीवर स्वार असलेल्या अज्ञातांनी अभिनेत्रीवर हल्ला केला. पायल हिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत घडलेली घटना सांगितली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री रडताना दिसत आहे. तर अभिनेत्रीच्या कारच्या काचा अज्ञातांनी फोडलेल्या दिसत आहे. अभिनेत्रीत्या आजू-बाजूला लोकांची गर्दी जमली आहे.

 

 

व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत नाराजी व्यक्त करत आहेत. सांगायचं झालं तर, अभिनेत्री साऊथर्न एव्हेन्यू येथून जार असताना एका बाईकने पायल हिच्या कारला धडक दिली. कारला धडक दिल्यानंतर बाईकवर स्वारांनी अभिनेत्री कारची काच उघडण्यास सांगितली. अभिनेत्रीने नकार दिल्यानंतर अज्ञातांनी दुसऱ्या बाजूने कारच्या काचा फोडल्या आणि पांढऱ्या रंगाची पावडर अभिनेत्रीच्या तोंडावर फेकली.

 

 

यावर पोलिसांनी देखील कारवाई केली आहे. पोलिसांनी अज्ञातांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या बाईकचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेकांनी अभिनेत्रीला तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल कर… असा सल्ला देखील दिला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री पायल हिच्यासोबत घडलेल्या घटनेची चर्चा रंगली आहे.

कोण आहे अभिनेत्री पायल मुखर्जी?

अभिनेत्री पायल मुखर्जी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. बंगाली सिनेविश्वात पायल हिचं नाव फार मोठं आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेता संजय मिश्रा याच्यासोबत पायल हिने ‘वो तीन दिन’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;