हायकोर्टात मिंधे सरकार तोंडघशी! खोटी माहिती प्रतिज्ञापत्रावर केली सादर, नंतर केले घुमजाव; न्यायालयाने उपटले कान

हायकोर्टात मिंधे सरकार तोंडघशी! खोटी माहिती प्रतिज्ञापत्रावर केली सादर, नंतर केले घुमजाव; न्यायालयाने उपटले कान

हाताने मैला उचलण्याची पद्धत महाराष्ट्रात बंद झाली असल्याची खोटी माहिती प्रतिज्ञापत्रावर देणाऱ्या मिंधे सरकारचे उच्च न्यायालयाने चांगलेच कान उपटले. माहिती सादर करताना जरा कायद्याची व्याख्या समजून घेत जा, असे खडे बोल न्यायालयाने मिंधे सरकारला सुनावले.

हाताने मैला उचलणाऱ्यांच्या विविध मुद्दय़ांवर न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यामध्ये मिंधे सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. महाराष्ट्रातील सर्व 36 जिह्यांत हाताने मैला उचलण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ही माहिती केंद्रीय समाज कल्याण विभागाला देण्यात आली होती. हे सर्व प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते.

या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्ते श्रमिक जनता संघाने आक्षेप घेतला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने याबाबत अचूक माहिती सादर करण्याचे आदेश  दिले. हाताने मैला उचलण्याची पद्धत महाराष्ट्रात संपूर्णपणे बंद झाल्याची माहिती गेल्या वर्षीची होती, असा खुलासा मिंधे सरकारने केला. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने मिंधे सरकारला फटकारत ही सुनावणी 9 सप्टेंबर 2024 पर्यंत तहपूब केली.

दक्षता समितीची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करा

हाताने मैला उचलणाऱ्यांची पद्धत कायमची बंद करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने दक्षता समिती स्थापन केली आहे. या समितीची माहिती सामाजिक न्याय विभागाने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावी. समितीने आतापर्यंत काय कारवाई केली आहे याची माहिती या वेबसाइटवर नमूद करा. ही माहिती अपडेट करत जा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तक्रारीसाठी सोशल मीडिया हँडल

हाताने मैला उचलला जात असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट व सोशल मीडिया हँडल तयार करा, जेणेकरून नागरिक व सामाजिक संघटना यावर तक्रार करु शकतील. पुढील सुनावणीपर्यंत याची प्रक्रिया पूर्ण करा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;