राज्यभरात 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठक घेणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

राज्यभरात 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठक घेणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

राज्यभरात 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठक घेणार असून, बैठकीत मतदार संघनिहाय बैठका, शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही आंदोलन हाती घेतले आहे. सरकार कसे शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देणार नाही हे आम्ही बघतो. चर्चा करून या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवारी आंतरवाली सराटी येथे दिली.

जरांगे पाटील म्हणाले की, सरकार तात्पुरती घोषणा करत कपडे वाटप करून लोकांना विकत घेत आहे का. शेतकरी देखील आमचाच आहे, सरकार लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही या प्रश्नांत लक्ष घालणार असून, सरकारला या प्रश्नावर नीट करणार आहे. 5 सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून घोंगडी बैठकीला सुरुवात करणार असून, आमची भूमिका लोकांसमोर मांडणार आहे. सगळ्या समाजाचे प्रश्न आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जास्त ताकद लावणार असून, घोंगडी बैठकीचा समारोप कुठे करायचा? याबाबत समाजाची भूमिका जाणून घेऊ, असेही जरांगे पाटील म्हणाले.

पोलीस भरती प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र काही जातीयवादी अधिकारी देत नाही. व्हॅलीडिटीसाठी 6 महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी मी केली आहे. सरकारने देतो म्हणून सांगितले आहे. क्युरेटीव्ह पिटिशन बाबत बोलताना सांगितले की, आमच आरक्षण ओबीसीत आहे. दिल्लीशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. निवडणुकीपुरता त्यांना वेळ काढून न्यायचा होता. निवडणूक पुढे ढकलली आहे. सगळ्यांचा रोष सरकारला झोप येऊ देत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

रात्री इकडे ड्रोन आले होते ते फडणवीस यांचे ड्रोन आहेत. त्यांनीच हेरगिरी करायला ड्रोन ठेवले आहेत. तरीही फडणवीस तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या ड्रोनने गोळ्या घातल्या तरी हरकत नाही. मी नसलो तरी माझा समाज लढाईसाठी तयार आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;