Chandrapur News – धक्कादायक! प्रसाधनगृहात मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल

Chandrapur News – धक्कादायक! प्रसाधनगृहात मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल

कोलकाता, बदलापूर, मुंबई, अकोला आणि कोल्हापूर सहीत देशाच्या विविध भागांमध्ये बलात्काराच्या गंभीर घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच चंद्रपूरमध्ये मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

चंद्रपूर जिल्हातील एका मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना जिल्हातील नागभीड येथे घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून ही घटना सोमवारी (12 ऑगस्ट) मध्यरात्री घडली आहे. पीडित तरुणी एकटी असल्याचे पाहून तिला आरोपींनी बसस्थानकातील प्रसाधनगृहात नेले आणि बळजबरीने अत्याचार केला. हा अत्याचार सुरू असतानाच दुसऱ्याने व्हिडिओ काढला आणि मित्राला पाठवला. त्याने हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला आणि शहरात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात येथील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत आज (23 ऑगस्ट) उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांना निवेदन देऊन आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. चित्रफीतीत दिसणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आणि काही तासात पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 64 (2), (क), 70(1) 87, 126(2), 3 (5) सहकलम 67,(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी पीडित तरुणीचा शोध घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे पाठवले आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागभीड येथे भेट देत तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. अधिक तपास नागभीड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;