Nagar News – एकरुखे गावात गॅस सिलिंडरचा स्फोट, नऊजणांसह पाच जनावरे होरपळली

Nagar News – एकरुखे गावात गॅस सिलिंडरचा स्फोट, नऊजणांसह पाच जनावरे होरपळली

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एकरुखे गावात घरगुती गॅस सिलिंडर लीक होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांसह जनावरे होरपळली. जखमींना तत्काळ प्रवरा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

राहाता तालुक्यातील एकरुखे येथील वायकर वस्ती आहे. शेजारी शेजारी दोन कुटुंब राहतात शेती बरोबर दूध उत्पादन करत असल्यामुळे त्यांच्याकडे दुधाळ जनावरे देखील आहेत. शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी 7 च्या भाऊसाहेब वायकर यांच्या घरातील गॅस टाकी संपली असता नवीन गॅस टाकी बसवत असताना टाकीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणली असता बाजूच्या घराबाहेर पाणी तापवण्यासाठी सुरू असलेल्या चुलीतील जाळाचा आणि गॅसचा संपर्क आल्याने मोठा स्फोट झाला. हा स्पोट इतका भयंकर होता की परिसरात जाळाचा मोठा भडका उडाला आणि महिला, पुरुष आणि लहान मुलांसह नऊ जण तसेच गोठ्यातील चार ते पाच जनावरे होरपळी आहेत. या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल सुरेश वायकर, अनुजा सुरेश वायकर, भाऊसाहेब गंगाधर वायकर, सृष्टी सुरेश वायकर, यश किरण विप्रदास यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जनावरांवरही उपचार सुरू आहेत. गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटाने परिसरात भितीचे वातावरण पसरलय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;