KBC 16: नरेशी मीणा होऊ शकली नाही केबीसीची पहिली करोडपती, 1 कोटीच्या या प्रश्नावर अडकली? तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

KBC 16: नरेशी मीणा होऊ शकली नाही केबीसीची पहिली करोडपती, 1 कोटीच्या या प्रश्नावर अडकली? तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

Kaun Banega Crorepati 16: बीग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोड़पति 16’ सुरु झाला आहे. या 16 व्या सीजनमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत नरेशी मीणा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांची काहणी ऐकून अमिताभ बच्चनसह स्टुडिओमधील अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु मीना एक कोटी जिंकू शकल्या नाहीत. एक कोटीसाठी असलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना देता आली नाही अन् 50 लाख घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.

‘कौन बनेगा करोड़पति 16’ शो मध्ये येताच नरेशी मीणा यांनी ब्रेन ट्यूमरसारखा आजार झाला असल्याचे सांगितले. त्या आजाराचे त्यांनी उपचार केले होते. परंतु हा आजार पूर्णपणे बरा झाला नाही. त्यासाठी आता पुन्हा पैसे लागणार होते. त्यामुळे पुढील उपचार थांबवले होते. आता या शोमधून मिळणाऱ्या पैशांनी त्या आजाराचे उपचार पुन्हा करणार आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांनीही त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी नरेशी यांचा आत्मविश्वास पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

एक कोटींच्या प्रश्नावर नरेशीने सांगितले…

नरेशी यांचा 1 कोटीचा प्रश्नाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, आजच्या शोसाठी तुम्ही जितक्या एक्साइटमेंट असला तितक्या चिंतत असणार आहेत. 50 लाख तुम्ही जिंकले आहेत अन् 1 कोटीसाठी दावेदारी आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नरेशी यांना 1 कोटींचा प्रश्न विचारला. “लीला राव दयाल किसे हराकर विंबलडन टेनिस चैंपियनशिप का एक सिंगल्स मैच जीतने वाली पहली भारतीय महिला बनी थीं?” त्यासाठी पर्याय दिले होते, ए- लॉटी डॉड, बी- ल्गॅडिस साउथवेल, सी- मे सेटन आणि डी – किट्टी गॉडफ्री.

नरेशी पडल्या गोंधळात

नरेशी मीणा या प्रश्नात कंन्फ्यूज होत्या. त्यामुळे त्यांनी शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांना तुम्ही काय उत्तर दिले असते? असे विचारले तेव्हा त्यांनी ए- लॉटी डॉड म्हटले. परंतु ते चुकीचे उत्तर होते. त्याचे योग्य उत्तर बी- ल्गॅडिस साउथवेल होते. त्यानंतर नरेशी 50 लाख रुपये घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एंडा येथील नरेशी मीणा आहेत. 27 वर्षीय नरेशी मीणा यांना 2018 मध्ये ब्रेन ट्यूमर झाला होता. 2019 मध्ये त्यांनी ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया केली. त्यासाठी आईचे दागिने विकले होते. परंतु त्यानंतरही ब्रेन ट्यूमर पूर्ण बरा झाला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;